अहमदनगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने ऊस तोडणी कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिरात विविध आजारांवर आवश्यक मोफत औषधोपचार करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर झाले. उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. संचालक सूर्यभान कोळपे, कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, मुख्य शेतकी अधिकारी कैलास कापसे, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. जैन आदी उपस्थित होते.