सांगली : डफळापूर (ता. जत) येथील श्रीपती शुगर कारखान्याच्यावतीने कामगार व मजुरांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १६४ जणांची मोफत तपासणी करण्यात आली. महिलांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आयसीटीसी, शुगर, सीबीसी, थायरॉइड, हिमोग्लोबिन, बी.पी., टी.बी. आदी तपासण्या करण्यात आल्या. साखर आयुक्तांच्या निर्देशानुसार, गळीत हंगामात ऊस तोडणी मजूरांसाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे कर्मचारी, ऊस वाहतूकदार चालकांचीही तपासणी करण्यात आली.
श्रीपती शुगरचे जनरल मॅनेजर महेश जोशी म्हणाले की, कारखान्यातील कामगार व मजुरांसाठी हे शिबिर आयोजित केले होते. भविष्यातही कारखान्याचे अध्यक्ष, संचालकांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना विविध उपक्रम राबविणार आहे. यावेळी चीफ केमिस्ट आर. बी. पाटील, रणजित जाधव, सिव्हिल विभागाचे श्रीधर पाटील, स्टोअरचे विशाल जिरगे, भ. म. कदम आदी उपस्थित होते. शिबिरासाठी आधार वेल्फेअर सोसायटीच्या रेखा पाटील, मनीषा वाघमारे, सुषमा इंगवले, उपजिल्हा जत ग्रामीण रुग्णालयाचे तानाजी सुतार, विणा शिंदे, महालॅबचे भारती, राधिका, समीना, दिलीप शिंदे, योगिता माळी, डॉ. आशा पाटील यांचे सहकार्य लाभले.