पांडुरंग कारखान्याच्यावतीने कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना कामगार कल्याण मंडळातर्फे येथील गणेश हॉल येथे कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. पंढरपूर येथील डॉ. काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात २२२ कामगार, अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉक्टरांचा डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरेंद्र काणे, डॉ. वर्षा काणे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बसवराज सुतार, फिजिशियन डॉ. प्रवीण बाबर, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भूषणकुमार पवार, दंतरोग तज्ञ डॉ. किरण पाटे, डॉ. सुधीर पोफळे, डॉ. प्रमोद पवार आदी यावेळी उपस्थित होते. शिबिराला मुख्य केमिस्ट एम. आर. कुलकर्णी, मुख्य लेखपाल रवींद्र काकडे, केन मॅनेजर संतोष कुमठेकर, अमोल बारटक्के, सोमनाथ भालेकर, एस. आर. पाटील, सोपान कदम, हनुमंत नागणे, तानाजी भोसले आदी उपस्थित होते. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सोपान कदम यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here