सहकार शिरोमणी कारखान्यावर आरोग्य तपासणी शिबिर

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. ८ ते १० जानेवारीपर्यंत झालेल्या या शिबिरात सुमारे २०० व्यक्तींनी लाभ घेतला. भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक मजुरांसाठी हे शिबिर राबविण्यात आले. शिबिरात क्षयरोग तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, स्त्रीरोग आदी तपासण्या करण्यात आल्या.

कारखान्याचे उपाध्यक्ष भारत कोळेकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेपाळ, प्रतीक्षा सोनवणे, संचालक सुरेश देठे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, मुख्य शेती अधिकारी अशोक गुळमकर, प्रतापराव थोरात, हरिभाऊ गिड्डे, बंडू पवार, डॉ. सावरे, आरोग्य सेविका काळे, माळी, मायणीकर आदींसह आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याने राज्याचे साखर आयुक्त आणि सोलापूरचे प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार, आरोग्य शिबिर घेऊन त्यांच्या आदेशाचे पालन केले आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी व्यवस्थापनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here