नवी दिल्ली: आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, भारतामध्ये कोरोनावायरस ची लस पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला मिळेल. राज्यसभेमध्ये आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, 2021 च्या सुरुवातीला भारतामध्ये कोरोना लस उपलब्ध होईल. सध्या हे स्पष्ट नाही की, सामान्य लोकांपर्यंत ही लस कधीपर्यंत पोचेल. मंत्र्यांनी कोरोना बाबत सरकारकडून केल्या जाणार्या प्रत्येक सकारात्मक प्रयत्नाबाबत माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. 7 जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये कोरोना संक्रमणाबाबत सूचना दिली. यानंतर सरकारने विनाविलंब या दिशेने काम सुरु केले होते.
डॉ. हर्षर्वधन यांनी सांगितले की, जुलै -ऑगस्ट मध्ये भारतात 300 मिलियन कोरोनाग्रस्त आणि 5 ते 6 मिलियन मृत्युंबाबत बोलण्यात आले होते, पण आम्ही हा अंदाज धुडकावून लावला आहे. त्यानी सांगितले की, सध्या जवळपास 11 लाख चाचण्या रोज होत आहेत. लवकरच याबाबतीत आपण अमेरिकेला मागे टाकू.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.