सतत खंडित वीज पुरवठ्यामुळे पाण्याअभावी उसाचे प्रचंड नुकसान

जालना : परतूर शहरासह ग्रामीण भागात वीज तासनतास गायब राहत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उसाच्या पिकाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. ज्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी विजेच्या लपंडावाच्या खेळामुळे सतत धडपड करावी लागत आहे. वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी असूनही पिके वाळू लागली आहे.

तालुक्यातील जुना वडगाव रस्त्यावरील रोहिना फिडरवरील उबाळे याच्या शेतातील रोहित्र जाळले आहे. मागील आठ दिवसांपासून रोहित्र बिघडलेले आहे. परिणामी पिके हातातून जात आहेत. महावितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकरीदीपक मुजमुले यांनी केला. वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. याकडे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विजय यादव यांनी केली. याप्रश्नी तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे यांनी दिला.

1 COMMENT

  1. Yes. India can create ample co -generation i. e. electricity from sugar cane baggase in many cane growing States,even to produce it about more than 300 days in a year with minimum cost . This electricity will be more useful in rural areas as per need and it has unique value during war years. India can export ample power produced from sugar cane and other crops residues and sun power.We must be realistic in farming ,food,feed sectors considering the overall progress in the problematic war era at global level in association with drastic climate change situations. We must work technically,more. Warm Regards. Dr.Patil A.S.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here