मुंबईत येत्या 24 तासात मोठ्या पावसाची शक्यता, काही दिवस असेच राहणार हवामान
मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेल्या 24 तासात मध्यम आणि अधिक पाउस झाला आहे. भारत हवामान विज्ञान विभागाने मंगळवारी सांगितले की, येणार्या दिवसांमध्ये या भागांमध्ये थांबून थांबून पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात माथेरान मध्ये सकाळी साडे आठ वाजता गेल्या 24 तासात 93.4 मिमी पाउस नोंद केला आहे. तर ठाणे बेलापूर औद्योगिक संघ वेधशाळेने 74 मिमी पावसाची नोंद केली आहे. मुंबई च्या पश्चिमी उपनगर सांताक्रुज हवामान केंद्राने या अवधीमध्ये 30.2 मिमी पाऊस नोंदवला आहे. दक्षिण मुंबईच्या कुलाबा हवामान केंद्राने या दरम्यान 13.4 मिमी पावसाची नोंद केली आहे.
भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या मुंबई शाखेचे उप महानिदेशक के.एस. होसालिकर यांनी ट्वीट केले की, मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात 7 जुलै सकाळी साडे आठ वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अनुसार रायगड जिल्ह्याच्या अलीबाग मध्ये सकाळी साडे आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासात 54 मिमी पाऊस नोंद केला गेला आहे . तर पालघरच्या डहाणू वेधशाळेमध्ये 34.7 मिमी पाऊस नोंदवला आहे. याशिवाय नाशिक हवामान केंद्राने 25.2 मिमी, कोकण क्षेत्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हरणाई केंद्रामध्ये 30.2 मिमी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दरम्यान 7.4 मिमी पाऊस नोंदवला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.