कोल्हापूर : शहरास जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक तास जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. विजेच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबल्याचे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून दुपारनंतर पाऊस हजेरी लावत आहे. आज दिवसभर कडकडीत ऊन पडले होते.
सायंकाळी पाचनंतर वातावरण ढगाळ झाले. सातच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. काही वेळात पावसाचा जोर वाढला. काही ठिकाणीपावसाचा जोर इतका होता की, समोरील काहीअंतरावरील दिसत नव्हते. पावसाने नागरिकांचीचांगलीच धावपळ उडाली. काहींनी दुकाने, हॉटेल,टपऱ्या आदी जागा मिळेल त्या ठिकाणी आसराघेतला तर काहींनी भिजत जाणे पसंत केले.पावसाने अनेक रिक्षा थांबे रिकामे झाले. रस्त्यावररिक्षा मिळत नव्हत्या. केएमटीच्या वेळापत्रकावरहीकाहीसा परिणाम झाला. शहरात आलेल्या भाविक,पर्यटकांची त्रेधातिरपट उडाली. शहराच्या प्रमुखबाजारपेठा, व्यापारी पेठातही व्यावसायिकांचीपावसाने दैना उडवली. निवडणूक प्रचारावरहीपावसाने पाणी फिरवले. काही उमेदवारांना रात्रीच्याकोपरा सभा, पदयात्रा रद्द कराव्या लागल्या.
जोरदार पावसाने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. अनेक गटारींना नाल्याचे स्वरूप आले होते. शहराच्या अनेक भागांत पाणी साचले. ताराराणीचौक, दाभोळकर कॉर्नर, परीख पूल, जनता बझारचौक, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरीबाजारपेठ, सीपीआर चौक, जयंती नाला पूल आदीअनेक ठिकाणी पाणी साचले. सीपीआर चौक वजयंती नाला पुलावर निम्मा रस्ता पाण्याने व्यापूनगेला होता. पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.