मुंबई : कोकणात दमदार पाऊस बरसत आहे. नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडीमध्ये इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. खेड, पोलादपूर व महाड ही तिन्ही शहरे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आहेत. महाड, पोलादपूर तालुक्यातील व खेड तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रायगड जिल्हयाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाड शहरावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. १८ जुलै रोजी पोलादपूर तालुक्यात १५२ मिमी पाऊस पडला आहे. पोलादपूर तालुक्यात आजपर्यंतचा एकूण पाऊस १२८५ मिमी आहे.