मुंबई : मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत पूर्ण हंगामात खूप पाऊस कोसळला आहे. देशातील आर्थिक राजधानी मुंबईत आज, मंगळवारीही जोरदार पाऊस सुरू आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हा पाऊस कोसळत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेस्टच्या ट्रेन, बस योग्य पद्धतीने सुरू आहे. पुढील २४ तासात शहरात जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. लोकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पहाटे व सकाळी काही ठिकाणी हलका पाऊस सुरू होता. मात्र, सकाळी दहा वाजल्यानंतर मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने पुढील २४ तासासाठी शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस आणि काही काळ मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वातावरण ढगाळ राहील असे म्हटले आहे. शहरात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात ७.९१ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र पू्र्ण हंगामात पाऊस झाला आहे.