महाराष्ट्रात पुढचे ७२ तास मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : आपल्या लाडक्या बापाच्या विसर्जनाच्या तयारीत असणाऱ्या मुंबई आणि पुणेकरांना पुढचे ७२ तास पाऊस चिंब करण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कमी दाबाचा एक पट्टा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत पुढे सरकला असून पुढच्या ७२ तासांमध्ये राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे, मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना बुधवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ७२ तासानंतर पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशीही ढगाळ वातावरणासोबत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here