महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, जाणून घ्या पावसाची स्थिती

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठून राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने शनिवारी, १० सप्टेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. आयएमडीने जारी केलेल्या अलर्टनुसार आज पश्चिम महाराष्ट्र, ओडिशा, पूर्व आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल, दक्षिण छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ई नवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान खात्याने सांगितले की, पुढील २४ तासांत या सर्व राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचवेळी दिल्लीत किमान तापमान २७ अंश आणि कमाल तापमान ३५ अंश राहण्याचा अंदाज आहे, त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीत आज हलके ढगाळ वातावरण राहिल.
पाणी साचल्याने रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. काही गाड्या वेळापत्रकापेक्षा उशिराने धावत आहेत. तथापि, भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) वेळोवेळी राज्यामध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. लोकांना जास्त समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी प्रयत्न केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here