तीन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईसह राज्यातील अनेक शहरात हाहाकार उडाला आहेे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, गडचिरोली सारख्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हजारो नागरीकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. पुण्यापासून ७० कि मी वर लोणावळा येथे रविवारी सकाळी घराची भिंत पडून दहा वर्षाय कुणाल अजय डोडके चा मृत्यू झाला आणि लहान बहिण जखमी झाली आहेे. पोलिसांनी सांगितले की, मुुसळधार पावसामुळे ही भिंत पडली. पावसामुळे झालेल्या आणखी एका दुर्घटनेमध्ये शनिवारी मध्यरात्री कोयना धरणाजवळ एका झऱ्यात कार पडून दोन लोकांचा मृत्यू झाला.
पुणे शहरात, खडकवासला पासून मुथा नदीमध्ये सोडलेल्या ४१,००० क्यूसेक्स पाण्या्मुळे भिडे पुल पाण्यााखाली आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.
पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहील या अंदाजामुळे सुरक्षितता म्हणून मुंबईसह राज्यातील ठाणे, रायगड़, पालघर, रत्नागिरी, कोल्हापुर, नंदुरबार, नासिक, गडचिरोली या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) ने पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात गुरुवारपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे या ठिकाणी सावधानतेचा इशारा दिला आहे .