हातकणंगले आणि शिरोळमधून 197 कुटुंबातील 802 व्यक्तींचे स्थलांतर
281 महिला 325 पुरुष आणि 196 लहान मुलांचा समावेश
कोल्हापूर, दि. 3 : जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 30 कुटुंबातील 140 व्यक्तींचे तर शिरोळ तालुक्यातील 167 कुटुंबातील 662 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. शाहूवाडी, गगनबावडा आणि भुदरगड तालुक्यातून एकाही कुटुंबाचे स्थलांतर झाले नाही. दरम्यानजिल्ह्यातील पावसाने उघडीप न दिल्यास पूरस्थिती भायनक होंणार असे संकेत दिले जात आहेत
स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील तीन गावामधील 30 कुटुंबांतील 140 जणांचे स्थलांतर केले आहे. इचलकरंजी-11 कुटुंबांपैकी महिला 18, पुरुष 21 लहान मुले 11 एकूण 50, इचलकरंजी शेळकेमळा-14 कुटुंबांपैकी महिला 21, पुरुष 26 लहान मुले 11 एकूण 58, रुई-3 कुटुंबांपैकी महिला 4, पुरुष 8 लहान मुले 10 एकूण 22, शिरोली पुलाची-2 कुटुंबांपैकी महिला 2, पुरुष 2 लहान मुले 6 एकूण 10.
शिरोळ तालुक्यातील 5 गावांमधून 167 कुटुंबातील 662 जणांचे स्थलांतर केले आहे. कुरुंदवाड- 91 कुटुंबांपैकी महिला 141, पुरुष 140 लहान मुले 32 एकूण 313, नृहसिंहवाडी- 27 कुटुंबांपैकी महिला 27, पुरुष 30 लहान मुले 73 एकूण 130, कवठेसार-4 कुटुंबांपैकी महिला 8, पुरुष 11 लहान मुले 5 एकूण 24, जुने दानवाड- 6 कुटुंबांपैकी महिला 4, पुरुष 7 लहान मुले 2 एकूण 13, शिरढोण- 39 कुटुंबांपैकी महिला 56, पुरुष 80 लहान मुले 46 एकूण 182 असा समावेश आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.