मुंबईत सकाळपासून संततधार, 9 जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : राजधानी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज (28 जून) सकाळपासून पाऊस पडत आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह नऊ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र कोल्हापूरमध्ये बुधवारी दिवसभर अत्यंत तुरळक पाऊस पडला. शेतकऱ्यांना मोठ्या दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे. पाऊस नसल्याने पेरण्या खोलंबल्या आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरसह 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here