सहानपूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. ऊस आणि भात शेती करणारे शेतकरी खुश झाले आहेत. पावसामुळे नदी, ओढेही वाहू लागले आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहारनपूर परिसरात ऊस आणि भाताची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात ऊस शेती १,२१,७८६ हेक्टरमध्ये केली जाते. तर भाताची लागवड ५८ हजार हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने शेतकरी खुश झाले आहेत. शेतकऱ्यांना सिंचनापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यमुना नदी काठावरील शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. आधीच पुराचे पाणी त्यांच्या शेतांमध्ये घुसले आहे. आता पावसाने पिके कुजण्याचा धोका वाढला आहे.