हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे पुराची स्थिती, विमाने रद्द

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने पुरासारखी स्थिती निर्माण जाली आहे. जोरदार पावसाने जुन्या शहरातील एका हॉटेलपर्यंत पाणी आले आहे. त्याशिवाय अनेक घरे, कार्यालये आणि रेस्टॉरंटमध्ये पाणी घुसले आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पाण्यात दोघेजण वाहून गेले.

जोरदार पावसामुळे वनस्थलीपूरम आणि कुकटपल्ली हे नाले ओव्हरफ्लो झाले. शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाने रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. पावसामुळे आठ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमध्ये अनेक रेस्टॉरंटमध्ये पाणी भरल्याचे तसेच नाल्यांमध्ये मोटारसायकल, पिकअप ट्रक वाहून झाल्याचे दिसून येत आहे. हैदराबादच्या हवामान विभागाच्या संचालकांनी सांगितले की, पुढील २४ तासात हैदराबादसह तेलंगणा राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हैदराबाद येथील वनस्थलीपुरम येथील अनेक भागात रस्ते पाण्याने भरले आहेत. घरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत पोलीस प्रमुख के. पुरुषोत्तम यांनी सांगितले की, जोरदार पावसाने नाल्याला आलेल्या पुरात दोघेजण वाहून गेले आहेत. परिस्थिती बिघडल्याने लोकांना जनजिवन विस्कळीत झाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here