कर्नाटकमध्ये पावसाचे तांडव सुरूच, बेंगळुरू बुडाले पाण्यात

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. बेंगळुरूमध्ये अद्याप जोरदार पावसाने अनेक भागात पाणी साठले आहे. मुसळधार पावसाने सिलिकॉन सिटी बेहाल झाली असून गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही भागात एवढे पाणी घुसले आहे की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर करावा लागला आहे.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी काही दिवस या संततधार पावसापासून बेंगळुरूला दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीने सांगितले की, पूर्ण आठवडाभर जोरदार पावसाचे तांडव सुरूच राहील. बुधवार आणि गुरुवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या या राजधनी शहरातील सिद्धपुरा भागात पावसाचे पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या २३ वर्षीय युवतीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही युवती स्कुटीवरून घरीत जात असताना हा प्रकार घडला. पावसाने शहरातील स्थिती बिघडल्याने लोकांमध्ये रोष वाढत आहे. सोशल मीडियावर लोकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here