महाराष्ट्रात पावसाचे तांडव सुरू आहे. गेल्या आठवड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या कालावधीत अनेक लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र आता पुन्हा एकदा ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्राच्या अनेक विभागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. रायगड, रत्नागिरी, सातारासह विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. विभागाने ३० जुलै पर्यंत पाऊस सुरू राहील अशी शक्यता आहे.
जोरदार पावसाची शक्यता पाहता हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी यलो अॅलर्ट जारी केला आहे. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला होता.
आता हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता दोन दिवसांसाठी ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे.
आगामी २४ तासात पाऊस वाढेल अशी शक्यता आहे. तर २९ आणि ३० जुलै या कालावधीत सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांनाही हवामान खात्याने ३० जुलैसाठी अलर्ट देण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link