मुंबई : भारतीय हवामान विज्ञान विभाग (आयएमडी) च्या मुंबई केंद्राचे उपमहानिदेशक के.एस. होसालिकर यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी साडे आठ पासून गुरुवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या कालावधीत बांद्रा आणि महालक्ष्मी भागात क्रमश: 201 आणि 129 मिमी पाऊस पडला आहे.
ते म्हणाले, गुरुवारीही मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या नुसार, सांताक्रूज हवामान केंद्रामध्ये गेल्या 24 तासात गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेपयंंत 191.2 मिमी पाऊस नोंद करण्यात आला. तर दक्षिण मुंबई च्या कुलाबा वेधशाळेनुसार 156.4 मिमि पावसाची नोंद केली आहे.
होसालिकर यांनी एका ट्वीट मध्ये सांगितले की, मुंबईमध्ये रात्रभर पाऊस झाला. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.अधिक़ारी म्हणाले, गुरुवारीही मुंबईमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तटीय रत्नागिरी जिल्ह्यातील हरणाई हवामान विभागामध्ये गेल्या 24 तासात 127.2 मिमी तर रत्नागिरी वेधशाळेमध्ये या दरम्यान 97.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विभागाने सांगितलेकी, ठाणे बेलापूर उद्योग संघाच्या हवामान विभागामध्ये 58.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तरी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 53 मिमी आणि रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान आणि अलीबाग मध्ये क्रमश: 48 मिमी आणि 41.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 35 मिमी पावसाची नोंद झाली आणि पालघर जिल्ह्यातील धनाउ वेधशाळेमध्ये 21.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.