हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कीव्ह (युक्रेन) : चीनीमंडी
युक्रेनमध्ये बिटापासून साखर तयार केली जाते. गेल्या काही दिवसांत युक्रेनमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बिटाच्या शेतीला बसला आहे. पावसामुळे बिटाचे अंकूर मातीखाली गेले आहेत तसेच त्याला वाढलेल्या आद्रतेचाही फटका बसत आहे. परिणामी साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता युकेशुगरने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी बिटाचे पीक पावसात वाहून गेले आहे. पावसामुळे मातीमध्ये तयार झालेला ओलावा बिटाच्या वाढीवर परिणाम करतो तसेच त्याच्यातील साखरेच्या प्रमाणावरही परिणाम करतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस मातीतील नायट्रोजन वाहून नेतो. त्यामुळे बिटाच्या रोपांची वाढ खुंटते. मातीतील ओलाव्यामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे छोटी रोपे मरून जातात. त्यामुळे युक्रेनमधील साखर तज्ज्ञांनुसार यंदा बिटाचे अपेक्षेइतके उत्पादन होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होऊन, स्थानिक बाजारपेठेत साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.