नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागातील मान्सून परतला आहे. मात्र, काही भागात पाऊस सुरूच आहे. देशाच्या या भागातील मान्सून अद्याप हटलेला नाही. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्र आणि गोवा राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज अंदमान, निकोबार द्वीपसमुहातही जोरदार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागानुसार कोकम, गोवा यासह महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवरील भागात पाऊस कोसळू शकतो.
हवामान विभागाने सांगितले की, नऊ ऑक्टोबर रोजी या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. तर या राज्यांशिवाय तमीळनाडू पुदुच्चेरी, करईकल या भागात १० ऑक्टोबरला पावसाची शक्यता आहे. ११ ऑक्टोबरलाही या भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीत ऊन-पावसाचा खेळ सुरू राहील अशी शक्यता आहे. कमाल तापमान ३६ डिग्रीपर्यंत राहील तर किमान तापमान २४ डिग्रीपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. हवेचा वेग ताशी ६ किलोमीटर राहील. उत्तर-पश्चिम भारताकडून दक्षिण-पश्चिम मान्सून १७ सप्टेंबरपासून परतू लागतो. मात्र, यंदा मान्सून उशीरा परतत आहे. देशाच्या काही भागात अजून तो सक्रीय आहे. देशाच्या अनेक भागातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची स्थिती आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link