नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक Hero MotoCorp ने १६ मे रोजी सर्व-नवीन OBD-II आणि E20 तंत्राच्या अनुरूप ॲडवेंचर मोटरसायकल XPulse २००-४ Valve लाँच केली.
XPulse २०० ४V ही E२०-अनुरूप इंजिनसह येते. हे इंजिन २० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवर चालू शकते, असे कंपनीने एक्सचेंजकडे सादर केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
या मोटारसायकलमध्ये ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD) म्हणजेच स्व-निदान प्रणालीदेखील आहे. त्यामुळे, वाहनातील कोणतीही त्रुटी किंवा दोष शोधण्यात मदत होतेत आणि हा दोष वापरकर्त्याच्या लक्षात आणून दिला जातो.
ही मोटरसायकल बेस आणि प्रो या दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. XPulse २०० ४V देशभरातील Hero MotoCorp डीलरशिपवर आकर्षक किमतीत (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपये १,४३,५१६ (बेस) आणि रुपये १,५०,८९१ (प्रो) उपलब्ध आहे. XPulse २०० ४V २००cc ४ वाल्व ऑइल कूल्ड BS-VI (OBD-II आणि E२० अनुरूप) इंजिनद्वारे चालविली जाते. या नवीन XPulse २०० ४V बोल्ड ग्राफिक्स आणि आकर्षक ड्युअल-टोन कलर स्कीम – मॅट नेक्सस ब्लू, टेक्नो ब्लू आणि ब्लॅक स्पोर्ट्स रेडसह येतो.
दरम्यान, Hero MotoCorp Ltd चे शेअर्स बुधवारी बीएसईवर ३७.५५ रुपयांनी वाढून २,७३३.५५ वर ट्रेडिंग करत आहेत.