बागपत : राज्य सरकारने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे साखर कारखान्यांनी विक्रमी ऊस गाळप केले आहे. बागपतमधील १२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३.१० कोटी क्विंटल ऊस खरेदी केला आहे.
एकूण उद्दीष्टाच्या ७५ टक्के ऊसाचे गाळप झाले आहे. सर्वाधिक गाळप मलकपूर साखर कारखान्याने आतापर्यंत १.०५ कोटी क्विंटल ऊस खरेदी केला आहे. तर रमाला सहकारी साखर कारखान्याने ७२ लाख क्विंटलहून अधिक उसाचे गाळप केले आहे. रमाला साखर कारखान्याने ऊस गाळपाबाबत राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला आहे.
वेळेवर ऊस खरेदी आणि गाळप झाल्याचा फायदा १.२६ लाख शेतकऱ्यांना झाला आहे. मात्र, ऊसाचे बिल देण्यास कारखाने टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्व १२ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे आधीचे आणि नव्या हंगामातील ९२३ कोटी रुपये थकीत आहेत.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगितले की, मलकपूर साखर कारखान्याकडे गेल्यावर्षीचे फक्त ५० कोटी रुपये खकीत आहेत. ते आगामी दोन-चार दिवसात दिले जातील अशी शक्यता आहे. या हंगामातील पैसे कारखान्यांना देण्यासाठी दबाव वाढविण्यात आला आहे.