नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढतच आहे. काही दिवसातच रोजच्या नव्या रुग्णांचा आकडा 1 लाखाला स्पर्श करेल, कारण प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा अधिक केस समोर येत आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 86,432 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 1,089 लोकांचा मृत्यु झाला आहे. यापूर्वी अमेरिकेमध्ये एका दिवसात सर्वात अधिक 77 हजार केसची नोंद झाली होती.
आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशामध्ये एकूण रुग्णांची संख्या 40,23,179 पर्यंत पोचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 8,46,395 इतकी झाली आहे. रिकवर होणार्या रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत 31,07,223 लोक आजारामुळे बरे झाले आहेत. कोरोनामुळे देशामध्ये आतापर्यंत 69,561 लोकांनी जिव गमावला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.