लखनौ : उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी सांगितले की, त्यांच्या विभागाने साखर उद्योग आणि डिस्टिरीत काम करणाऱ्या मजुरांसाठी जादा मजुरीला मान्यता दिली आहे.
त्यांनी सांगितले की, योगी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात कामगार विभागाने महिला सुरक्षा, बाल आणि कामगार पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत केले आहे. मंत्री राजभर यांनी सांगितले की, काम करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एका धोरणाची घोषणा केली आहे. त्यातून त्या महिला आत्मनिर्भर बनू शकतात. राज्यात ठिकठिकाणी रोजगार मेळावे आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. गेल्या १०० दिवसांत कामगारांशी संबंधीत निर्णय घेतले आहेत. ही कामे ऑनलाईन केली आहेत. कोणत्याही विभागाबाबत आता कामगारांशी संबंधीत तक्रारी ऑनलाईन करता येणार आहेत.