नैरोबी(केनिया): केनिया मध्ये आयातीतील वाढीनंतर साखरेच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून आले होते. पण आता कोरोना वायरस मुळे येणाऱ्या दिवसात साखरेच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. लॉक डाऊनमुळे साखरेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
गेल्या महिन्यात ३० टक्याने साखरेच्या दरात वाढ झाली होती, पण आयात वाढल्यानंतर या महिन्यात दरात घसरण झाली. यामुळे कोरोना सारख्या माहामारी मुळे रोजच्या आवश्यक वस्तूसाठी लढणाऱ्या अनेक लोकांना दिलासा मिळाला आहे.
साखर संचालनालयाने सांगितले की, जानेवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान साखरेची आयात एकूण 458,631 टन इतकी राहिली, जी गेल्या हंगामात केवळ 284,169 टन इतकी होती. स्थानिक उत्पादन घटल्यामुळे आणि मागणी वाढल्याने साखर आयातीला मोठा फायदा झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा