रायपूर (छत्तीसगड) : चीनी मंडी
केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्याची चर्चा सुरू केल्यानंतर रायपूरच्या स्थानिक बाजारपेठेत होलसेलचे दर १०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. साखरेचे होलसेल व्यापारी प्रसन्न धाडीवाल यांच्या अंदाजानुसार साखरेची किमान विक्री किंमत २९०० रुपयांवरून ३२०० रुपये प्रति क्विंटल केली जाऊ शकते. त्यामुळे साखरेच्या दरांमध्ये तेजी पहायला मिळत आहे.
रायपूरच्या बाजारपेठेचा विचार केला तर, आठवडाभरात साखरेच्या होलसेल दरांमध्ये १०० रुपयांची वाढ पहायला मिळाली आहे. त्यामुळे सध्या ३३०० रुपये क्लिंटल दराने साखरेचा व्यवहार होताना दिसत आहे.
रिटेल बाजारपठेत मात्र साखरेचा दर ३५ ते ३७ रुपये किलो असाच आहे. यापूर्वी दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये साखरेचा दर ३३०० रुपये प्रति क्विंटल होता. दिवाळीत साखरेची मागणी वाढल्यानंतर दरामध्ये तेजी पहायला मिळत होती. त्यात दर ३४०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठावड्यात साखरेचे दर ३२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत येऊन पोहोचले.
आता किमान विक्री किंमत वाढण्याची शक्यता असल्याने येत्या काळात साखरेच्या दरांत आणखी वाढ पहायला मिळणार आहे.
येत्या १७ जानेवारीनंतर विवाहांचे मुहूर्त पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत तेजी येण्याची शक्यता आहे. पण, साखरेचे उत्पादन आणि साठ्याचा विचार केला तर, किमतींमध्ये खूप मोठी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे.
‘इस्मा’च्या आकेडवारीनुसार डिसेंबरपर्यंत देशात ११०.५२ लाख टन साखरचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन जास्त आहे. दरम्यान, रायपूरच्या स्थानिक बाजारात खाद्य तेलाचे भावही तेजीत आहेत.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp
True