शिमला : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडच्यावतीने ऊना जिल्ह्यात दररोज १२५ किलोलीटर क्षमतेचा ४०० कोटी रुपये खर्चाचा धन्यावर आधारित इथेनॉल युनिट स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले की राज्य सरकार या युनिटसाठी सुमारे ७० एकर जमीन आणि उच्च क्षमतेचा रेल्वे संचलित पीओएल टर्मिनलची सुविधा देईल.
तांदूळ आणि मक्का अशा मुख्य कच्च्या मालाची खरेदी कांगडा, हमीरपूर, विलासपूर आणि ऊना जिल्ह्याशिवाय पंजाबच्या होशियारपूर आणि रुपनगर जिल्ह्यातून केली जाईल. या युनिटसाठी ४०० कोटींची गुंतवणूक असेल आणि सुमारे ३०० जणांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. ही योजना राज्याच्या विकासाची गती वाढवेल असे ते म्हणाले.
ठाकूर यांनी सांगितले की, अलिकडेच नवी दिल्लीच्या दौऱ्यावेळी त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून राज्यात एचपीसीएलच्या माध्यमातून इथेनॉल युनिट सुरू करण्याची मागणी केली होती. या युनिटसाठी राज्य सरकार ७० एकर जमीन देणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link