श्रीलंका: कोरोना वायरस ने साखर उद्योगावर मोठा परिणाम केला आहे. यामुळे जगभरात मोठ्या संख्येने उद्योग बंद आहे. याचा परिणाम श्रीलंकेतील जनजीवनावर तसेच उद्योगांवरही झाला आहे.
श्रीलंकेतील हिंगुराना साखर कारखान्यावर हजारो मजूर, कर्मचारी आणि ऊस शेतकर्यांचे आयुष्य अवलंबून आहे, पण कोरोनामुळे हा कारखानादेखील बंद करण्यात आला होता. यामुळे या सर्वांच्या आयुष्यावर धोक्याचे सावट होते.

या सर्व अडचणींना पाहता अर्थव्यवस्थेला पुनर्जिवित करण्यासाठी हिंगुराना साखर कारखान्यातील काम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोनाला आव्हान देवून कारखान्याचे काम सुरु केले जाईल.