मेरठ : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उसाची आवक घटल्याने किनौनी साखर कारखान्यात नो केन स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणी बंद करावी लागली. तर कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्रातही पाणी साठल्याने तेथील खरेदी मंदावली. दिवसभरात केंद्रांवर आठ हजार क्विंटल आणि कारखाना गेटवर ९ हजार क्विंटल उसाची खरेदी झाली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किनौनी साखर कारखान्याकडून दररोज विविध केंद्रांवर जवळपास ८० हजार क्विंटल तर गेटवर ३५ हजार क्विंटल उसाची नियमित खरेदी होते. मात्र, गेल्या १२ तासात आवक थंडावल्याने अतिशय संथ गाळप सुरू आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष के. पी. सिंह यांनी सांगितले की, अशीच स्थिती राहिली तर कारखान्यात नो केन स्थिती वाढून गाळप थांबवावे लागेल.