होंडाची भारतात आपली पहिली फ्लेक्स फ्युएल मोटारसायकल लाॅंच करण्याची योजना

नवी दिल्ली : होंडा भारतामध्ये आपली पहिली फ्लेक्स फ्युएल मोटारसायकल लाँच करण्याची योजना तयार करीत आहे, अशी घोषणा Honda Motorcycles and Scooters India (HMSI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाटा यांनी बुधवारी दिल्लीत जैव ईंधन विषयक एका आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान केली. HTAuto ने याबाबतचे वृत्त दिले आहे. ते म्हणाले की, फ्लेक्सी फ्युएल मोटारसायकलचे हे पहिले मॉडेल २०२४च्या अखेरीस लाँच केले जाईल. यासाठी कोणत्या ब्रँडचा वापर फ्लेक्स फ्यूएलसाठी वापरले जाईल याविषयी मात्र, त्यांनी माहिती दिलेली नाही.

मात्र, टीव्हीएस मोटरने होंडाला मागे टाकून भारतात फ्लेक्स-फ्युएल इंजिनवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांचे लाँचिंग केले आहे. मात्र, होंडाने याचे जागतिक स्तरावर लाँचिंग केले आहे. Honda CG150 Titan Mix ही जगातील पहिली फ्लेक्स फ्युएल मोटारसायकल होती, ती २००९ मध्ये ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आली होती. या टू व्हीलर ब्रँडने NXR १५० Bros Mix and BIZ १२५ Flex सारख्या फ्लेक्स फ्युएल इंजिनने चालणारी मोटारसायकलही ब्राझीलमध्ये लाँच केली होती.
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर्स इंडियाने देशात फ्लेक्स फ्युएल मोटारसायकल लाँच करण्याची घोषणा अशा वेळी केली आहे की, केंद्र सरकार वाहन निर्मात्यांना स्वच्छ आणि किफायती वैकल्पिक इंधनावर आधारित वाहनांच्या निवडीसाठी प्रोत्साहन देत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महागड्या तेलाची आयात कमी करण्यासाठी देशात फ्लेक्स-फ्युएल वाहनांच्या लाँचिंगसाठी विशेष रुपात काम करत आहेत. अलिकडेच त्यांनी पहिल्या फ्लेक्स-फ्युएल कार, टोयोटा कॅमरी हाइब्रिड मॉडलचे अनावरण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here