लखनौ : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीकडून आता सादर करण्यात आलेले दुचाकी वाहन २० टक्के इथेनॉल मिश्रीत इंधनावर चालण्यास सक्षम आहेत. कंपनीने दुचाकी वाहनांसाठी २० टक्के इथेनॉल मिश्रण इंधनासाठी आवश्यक ते बदल केले आहेत.
याबाबत द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार कंपनीने राज्यात आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी राजधानीत १०० सीसी बाईक सादर केली आहे. ते म्हणाले की, बहुतांश सर्व दुचाकी मालक ई २० मिश्रण कार्यक्रमाबाबत आशादायी आहेत. कंपनीचे अध्यक्ष, सीईओ आमि कार्यकारी संचालक सुत्सुमु ओटानी यांनी सांगितले की, युपीमध्ये शाइन १०० सादर करणे हे आमच्यासाठी मैलाचा दगड आहे. आणि उत्कृष्टता, ग्राहकांचे समाधान यासाठी आमची टीम कटिबद्ध आहे.
कंपनीचे विक्री आणि वितरण संचालक योगेश माथूर म्हणाले की, ग्राहकांडून १०० सीसीच्या बाईक्स सर्वाधिक पसंत केल्या जात आहेत. माथूर म्हणाले की, सद्यस्थितीत युपीच्या बाजारपेठेत आमचा हिस्सा १३ टक्के आहे. आम्हाला विश्वास आहे की नव्या उत्पादनांसाठी प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.