नवी दिल्ली : या वर्षीच्या सुरुवातीला Honeywell (हनीवेल) ने एक नवीन इनोव्हेटिव्ह इथेनॉल टू जेट फ्युएल (ETJ) प्रक्रिया तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे. पेट्रोलिमय व आधारित जेट इंधनाच्या तुलनेत हे तंत्रज्ञान ग्रीनहाऊस गॅस (जीएचजी) उत्सर्जन ८० टक्के कमी करू शकते. या तंत्राचा विकास गुरुग्राम येथील हनीवेल इंडिया टेक्नोलॉजी सेंटरमध्ये करण्यात आला आहे. इथेनॉल-टू-जेट फ्युएल (ETJ) प्रक्रिया तंत्रज्ञान उत्पादकांना साखर अथवा मक्का या सेल्युलोसिक आधारित इथेनॉलचा स्थायी विमान ईंधनात (SAF) बदल करता येईल. हनीवेल युओपी इंडियाचे उपाध्यक्ष आणि सरव्यवस्थापक आशीष गायकवाड यांनी फायनान्सिशल एक्स्प्रेसला विमान क्षेत्राद्वारे अवलंबिल्या जात असलेल्या कंपनीच्या नव्या ETJ तंत्राची माहिती दिली.
गायकवाड म्हणाले की, हनीवेलचे इथेनॉल-टू-जेट फ्युएल (ETJ) तंत्रापासून उत्पादित जेट इंधन पेट्रोलिमयवर आधारित जेट इंधनाच्या तुलनेत, एकूण जीवन चक्राच्या आधारावर ग्रीन हाऊस गॅस (GHG) उत्सर्जन ८० टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. ते म्हणाले की, जागतिक टिकाऊ विमान इंधन (एसएएफ) बाजार गतीने विकसित होत आहे. आणि नजिकच्या भविष्यात तो आणखी गतीने वाढण्याची अपेक्षा आहे. उद्योगाच्या रिपोर्टमध्ये २०२२-३२ यादरम्यान एसएएफ बाजारामध्ये ६० टक्के सीएजीआरची भविष्यवाणी करण्यात आली आहे. भारतामध्ये SAF स्वीकारण्याची सध्याची प्राथमिक अवस्था आहे. कमी कार्बन उत्सर्जनासाठी मिश्र इंधनावर काही प्रायोगिक तत्त्वावर उड्डाणे झाली आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये स्पाइसजेटने पहिले असे उड्डाण केले होते, जे ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि २५ टक्के बायोजेट इंधनाच्या मिश्रणावर अवलंबून होते. ते जेट्रोफा प्लांटपासून तयार करण्यात आले होते.
हनीवेलने जीएसजी उत्सर्जन कमी करण्यासाठी, जागतिक एसएएफ उत्पादनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि स्वच्छ इंधनाची गतीने वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी विमान क्षेत्रातील प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आपल्या इकोफायनिंग तंत्रासोबत एसएएफ उत्पादनाचे नेतृत्व केले आहे. इथेनॉलसारख्या मुबलक प्रमाणातील फिडस्टॉकमध्ये एसएएफचे उत्पादन करण्यासाठी उपाययोजना करून SAF च्या उच्च उत्पादनाला पाठबळ दिले जाते.
गायकवाड यांनी सांगितले की, टिकाऊ फीडस्टॉकचा पर्याय विकसित करण्याच्या दिशेने हनीवेलचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आणि ही बाब केवळ विमान क्षेत्रापुरती मर्यादीत नाही.