सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दि. १७ व गुरुवार दि.१८ जानेवारी रोजी कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू कुस्ती केंद्रात पुरुष व महिलांची मानधन कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत वाळवा तालुका व कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले. स्पर्धेचा प्रारंभ बुधवार दि. १७ रोजी दुपारी ३ वा. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे.
पुरुष मल्लांची स्पर्धा १४ वर्षे, १७ वर्षे व खुल्या गटात होणार आहे. १४ वर्षाखालील गटात ४० किलो, ४५ किलो व ५० किलो गट आहेत. १७ वर्षाखालील गटात ५५ किलो व ६० किलो गट आहेत. तर खुल्या गटात ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ८० किलो, ८६ किलो, ९२ किलो गट आहेत. तसेच महिला मल्लांच्यामध्ये ६१ किलो, ६५ किलो, ७२ किलो व ७६ किलो गट आहेत. पुरुष मल्लांच्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना तर, महिला गटातील पहिल्या दोन विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. कारखान्याच्या कुस्ती केंद्रात राहणाऱ्या पुरुष विजेत्या
मल्लांना मानधन दिले जाणार आहे. स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे व बाद पद्धतीने होणार आहे. मल्लांनी दि. १७ रोजी स. ९ ते १२ या वेळेत नावे नोंदणी करावी. येताना जन्माचा दाखला, आधार कार्ड आणावे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. इच्छुक मल्लांनी पै. कुंडलिक गायकवाड, नितीन सलगर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रतीक पाटील यांनी केले आहे.