मुरादाबाद : उसाच्या चांगल्या प्रजातीची पैदास करणाऱ्या बिलारीमधील रोजा गावातील महिला शेतकरी सावित्री देवी यांना जिल्ह्याचे प्रभारी मंत्री डॉ. महेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अगवानपूर येथील सिरसा गावातील ऋषिपाल यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह यांनी सांगितले की, ऊस विभागाने पंचायत भवनमध्ये स्टॉल्स लावून शेतकऱ्यांना माहिती दिली. चांगल्या प्रतीची किटकनाशके आणि जैविक खतांचाही प्रदर्शनात सहभाग होता. प्रभारी मंत्री डॉ. सिंग यांनीच्या हस्ते उसाचे जादा उत्पादन घेणाऱ्या चार शेतकऱ्यांचा पंचायत भवनमध्ये पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
याशिवाय उसाचे चांगले उत्पन्न घेतलेल्या मोरा मुस्तकम गावातील ऊस उत्पादक शेतकरी हरनाम सिंह, ललित चौधरी, मनकरा गावातील जोधा सिंह, नाजपूर गावचे यशपाल सिंह, सुनील कुमार, पानूवाला येथील राजपाल सिंह, वीरुवाला गावचे शैलेंद्र कुमार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुरादाबाद ऊस विभागाचे कर्मचारी आशिष चौहान, हिमांशू मौर्य यांनाही चांगल्या कामाबाबत प्रशस्तीपत्र देण्यात आले.