कोरोनाशी संघर्षा दरम्यान, देंशामध्ये आर्थिक व्यवस्थेला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. या अंतर्गत सर्वात अधिक कोरोना प्रभावित राज्य महाराष्ट्रामध्ये आजपासून हॉटेल्स,रेस्टॉरंन्ट, बार आणि उपहार गृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आजपासून मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरन्ट आणि बार पुन्हा सुरु होत आहेत. कोविड-19 महामारीला पाहता ते 6 महिन्यापासून अधिक काळ बंद होते. हे सुरु झाल्याने हॉटेल उद्योगाला थोडा दिलासा मिळेल.
या सेवा आजपासून 50 टक्के क्षमतेने पुन्हा सुरु होत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार, कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तीच या सेवांचा लाभ घेवू शकतात. तसेच सर्वच हॉटेल्स, बार, रेस्टॉरंन्ट आणि फूड कोर्ट ला कोविड-19 च्या नियमांचे पालन करणे अनिवार्यकरण्यात आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.