HPCL कडून E२७ ईंधन आणि इथेनॉल मिश्रीत डिझेल इंधनावर यशस्वी प्रायोगिक अभ्यास सुरू

हिन्दुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडने (HPCL) ई २७ (E २७) ईंधन आणि इथेनॉल मिश्रित डिझेल ईंधन वापर करणाऱ्या वाहनांबाबत जमिनीवर प्रायोगिक अभ्यासाला सुरुवात केली आहे. पेट्रोलियम तथा नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या अंतर्गत एचपीसीएल अशा प्रकारचा व्यापक शोध कार्यक्रम सुरू करणारी पहिली इंधन वितरण कंपनी बनली आहे. हा कार्यक्रम भारताला २०२५ पर्यंत इथेनॉल मिश्रण योजनेचा एक भाग आहे.

एप्रिल २०२३ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (ई २०) आणि एप्रिल २०२५ पर्यंत त्याच्या व्यापक उपलब्धतेसाठी ही योजना कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणीसाठी तयार केली आहे. एप्रिल २०२३ मध्ये ई १० अनुकूल इंजीन असलेली वाहने आणि ई २० च्या समग्र अनुपालनाच्या सुरुवातीवर भर देण्यात आला आहे. एप्रिल २०२५ पासून ई २० अनुकूल इंजीन वाहनांचे उत्पादन सुरू होईल.

एचपीसीएलने बेंगळुरूस्थित देवनगुंथी येथे अत्याधुनिक विकास केंद्रात जैव इंधनावर संशोधन सुरू केले आहे. केंद्रात तज्ज्ञांचे पथक इथेनॉल-पेट्रोल १० टक्क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर काम करीत आहेत. इथेनॉल-डिझेल मिश्रणाबाबत वाहनांचे परीक्षण केले जात आहे.

सुरुवातीच्या अभ्यासात नियमित पेट्रोल वापराच्या तुलनेत ई २७ इंधनयुक्त वाहनांतून कार्बन डायआक्साइड आणि टीएचसी उत्सर्जनात उल्लेखनीय घट दिसली आहे. आता एचपीसीएल प्रवासी कारमध्ये इथेनॉल-डिझेल मिश्रणाचे परिक्षण करीत आहे. २० हजार किलोमीटरपर्यंत प्रवासाचे याचे उद्दिष्ट आहे.

या पायलट प्रोजेक्टमध्ये दुचाकी वाहनांसाठी १० हजार किलोमीटर आणि प्रवासी कारमध्ये २० हजार किलोमीटरचे अंतर पार करण्याचा प्रयत्न आहे. बायोडिझेल आणि डिझेल समायोजनाबाबत आयएस १४६०:२०१७ ईंधन निर्देशानुसार इथेनॉल परिक्षण केले जाईल.

इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात भारत पुढील टप्प्यात ई २० इंधनापासून पुढे ई २७ टक्क्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातून भारत जागतिक स्तरावर ब्राझीलच्या बरोबरीने सक्षमपणे उभा राहू शकेल.

एचपीसीएलने ६ फेब्रुवारी २०२३ रोजी देशभरातील २३ किरकोळ विक्री केंद्रात (आरओ) ई २० इंधनास यशस्वीपणे सुरुवात केली आहे. देशातील २१ राज्यांत कंपनीची ई २० आरओंची एकूण संख्या ३५० आहे. कंपनीने आतापर्यंत ३,००० मेट्रिक टन ग्रीनहाऊस गॅसमध्ये उत्सर्जन कमी केले आहे. २०२५ पर्यंत ई २० इंधन वापराने २०० लाख एमटीपेक्षा अधिक जीएसटी उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here