HPCL द्वारे लवकरच इथेनॉल कुकिंग स्टोव्ह लॉचिंगची शक्यता

नवी दिल्ली : एलपीजीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि सातत्याने वाढणारे इंधन बिल वाचविण्यासाठी भारत लवकरच बायो -इथेनॉलवर चालणारा कुकिंग स्टोव्ह लाँच करू शकतो. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गुवाहटीच्या सहकार्याने केंद्राद्वारे संचलित हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL/एचपीसीएल) ने इथेनॉलवर चालणारा स्टोव्ह विकसित केला आहे. इथेनॉल एक हरित इंधन आहे, ज्याचे उत्पादन साखर अथवा धान्याच्या किण्वन प्रक्रियेद्वारे केले जाते.

एचपीसीएलने स्टोव्हसाठी इथेनॉल खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी इथेनॉल एटीएम (स्वयंचलीत टेलर मशीन) लाँच करण्याची योजनाही तयार केली आहे. या एटीएमला एचपीसीएलच्या रिटेल आऊटलेटमध्ये लावले जावू शकते. एचपीसीएलने याविषयी कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला.

इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सुत्रांनी सांगितले की, इथेनॉल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे आणि जसजसा भारत पेट्रोलसोबत आपल्या इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वाढवेल, तसतशी पुरवठ्यात वाढ होईल. इथेनॉल कुकिंग स्टोव्हमध्ये वापरल्याने एलपीजी आयातीच्या बिलात मोठी कपात शक्य आहे.

दरम्यान, एचपीसीएल इथेनॉल इंधन स्टोव्ह लाँच करणारी पहिली कंपनी नाही. कोको नेटवर्क्स कंपनीने आधीच इथेनॉल इंधनाच्या स्टोव्हचे उत्पादन केले आहे. कोको नेटवर्क्स साणंद (गुजरात) मध्ये एक अत्याधुनिक उत्पादनाचे निर्माण करीत आहे. कंपनी पुढील दोन वर्षात आपली उत्पादन क्षमता २ ते २.५ टक्के वाढविण्यावर काम करीत आहे. कंपनीचे पूर्व आफ्रिका आणि भारतात १,२०० + कर्मचारी कार्यरत आहेत. सद्यस्थितीत भारतात १० बिलियन लिटरपेक्षा अधिक इथेनॉल क्षमता आहे आणि २०२३ च्या अखेरीस ती १२.५ अब्ज लिटरपेक्षा अधिक असेल.

भारताने गेल्या दोन वर्षात पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रण दुप्पट करून १० टक्के केले आहे. इथेनॉल मिश्रण या वर्षी १२ टक्क्यांपर्यंत पोहोचे आणि २०२५ पर्यंत २० टक्क्यांचे उद्दिष्ट ते पूर्ण करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here