मंत्रिमंडळाने 2020-21 साखर हंगामासाठी उसाची एफआरपी रु 10/Qntl. ने वाढवली

नवी दिल्ली : शेतकर्‍यांना आता त्यांच्या ऊस पिकासाठी अधिक दर मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अद्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ऊस शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 साठी ऊसाची एफआरपी 10 रुपये प्रति क्विंटल वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे. साखर वर्ष प्रत्येक वर्षी 1 ऑक्टोबरपासून सुरु होवून पुढच्या वर्षीच्या 30 सप्टेंबरपर्यंत चालते.

गेल्या वर्षी खरेदी मूल्यात वाढ केली नसल्याने ऊस शेतकरी खूप नाराज होते. पण यावर्षी सरकार च्या या निर्णयाने शेतकर्‍यांना त्यांच्या ऊस पीकावर 285 रुपये प्रति क्विंटल चा दर मिळणार आहे. FRP शिवाय काही राज्य सरकारही आपल्याकडून शेतकर्‍यांसाठी ऊसाचा दर निश्‍चित करते. याला SAP म्हणतात. गेल्या वर्षी 2019-20 साठी उत्तर प्रदेश सरकारने ऊसाचा SAP 325 रुपये प्रति क्विंटलपर्यंत निश्‍चित केला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here