सातारा : कृष्णा कारखान्यास सहकारी साखर कारखाना संघातर्फे उच्च तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सातारा : यशवंत मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. देशातील साखर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे. लवकरच नवी दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मुल्यांकन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे पारितोषिके जाहीर केली जातात.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कृष्टतेची दखल घेऊन, २०२३-२४ या हंगामासाठी उच्च साखर उतारा गटात उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठीच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड केली असल्याचे पत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी कारखान्यास दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here