मुंबई : महिनाभरापूर्वी 200 ते 250 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता 3 ते 5 रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. टोमॅटो बाजारात पोहोचवण्यासाठीचा खर्चही नाईट नसल्यामुळे असहाय्य शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावे लागत आहेत. काही शेतकरी टोमॅटो जनावरांना खायला घालत आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही देशातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. सध्या टोमॅटोचे बंपर उत्पादन झाले आहे. त्यामुळे टोमॅटो 3 ते 5 रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटोचे भाव स्वस्त असूनही त्याला ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांना टोमॅटो कवडीमोल भावाने विकावा किंवा फेकून द्यावा लागत आहे.
पुण्यात टोमॅटो पाच रुपये किलो, तर कोल्हापुरात दोन ते तीन रुपये किलोने विकला जात आहे. त्याचवेळी नाशिक, पिंपळगाव, लासलगाव या घाऊक बाजारात टोमॅटोची सरासरी ९०० रुपये प्रति क्रेट दराने विक्री होत आहे. हाच टोमॅटो दीड महिन्यांपूर्वी दोन हजार रुपये प्रति कॅरेट दराने विकला जात होता. एका क्रेटमध्ये 20 किलो टोमॅटो असतात.