तुकडा तांदूळ व्यवसायाचा मोठा विस्तार, बंदीपूर्वी भारतातून सुरू होती तिप्पट निर्यात

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून भारताची कृषी निर्यात खूप वाढली आहे. फळे, भाजीपाला, चहा, कॉफीसह भारताच्या गहू, तांदूळ अशा सर्व वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारातून अधिक मागणी होती. वाणिज्य तथा उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन दिसून येते की, भारतातील तुकडा तांदळाला परदेशात सर्वाधिक मागणी होती. त्यामुळे तुकडा तांदूळ निर्यातीमध्ये देशाने उच्चांक प्रस्थापित केला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार निर्यात बंदीपूर्वी पहिल्या चार वर्षात तुकडा तांदळाची निर्यात ३ पट वाढली होती. अलिकडेच वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये भारताने १२.२१ लाख मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला. ही निर्यात २०२२-२३ मध्ये वाढून ३८.९० लाख टनावर पोहोचली. सरकारने सध्या तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी इतर अनेक देशांकडून याची मागणी टिकून आहे.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश असूनही चीन हा भारताचा सर्वात मोठा, तुकडा तांदळाचा ग्राहक आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसर, आफ्रिकेतील देशांमध्येही तुकडा तांदूळ निर्यात केला जात होता. मात्र, कोरोना महामारी आणि आफ्रिकन देशांच्या धोरणामुळे २०१९-२० मध्ये निर्यातीत थोडी सुस्ती दिसून आली होती. वाढत्या निर्यातीबाबत एक्स्पर्ट्सनी सांगितले की इतर देशांच्या तुलनेत भारतीय तुकडा तांदूळ २५ ते ३० टक्के स्वस्त आहे. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजाात भू-राजकीय कारणांमुळे तांदळाची मागणी अधिक आहे. भारताचा बासमती तांदूळ ही इतर देशांपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे युरोपियन आणि अबर देशांमध्ये याची मागणी अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here