पुणे : साखर कारखान्यांनी विजेच्या उत्पादनासाठी सोलर पॅनल बसविण्यास परवानगी दिल्यास सौर ऊर्जा कंपन्यांकडून त्यांना साखर साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे असा प्रस्ताव आला आहे. साखर उद्योगासमोरील विविध प्रस्तावांचा आढावा मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) झालेल्या बैठकीत उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी त्यांनी सोलर कंपन्यांच्या प्रस्तावाची माहिती दिली.
काही खासगी फर्म्सनी ग्रामीण भागामध्ये सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रस्ताव दिला आहे असे पवार यांनी सांगितल्याचे हिंदूस्थान टाइम्सने म्हटले आहे. बहुतांश कारखाने ग्रामीण भागात आहेत. तेथे साखर साठवणुकीसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे कंपन्यांनी साखर कारखान्यांमध्ये सोलर पॅनल उभारणीची परवानगी मागितली असून त्याबदल्यात साखर साठवणुकीसाठी मोफत गोडावून देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पवार यांनी या प्रस्तावाची अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रस्तावाचा अभ्यास करण्यास सांगितले आहे असे ते म्हणाले. यापूर्वी उसाचा उपयोग फक्त साखर उत्पादनासाठी केला होता. मात्र, आता साखर उद्योगाने यात इथेनॉल, डिस्टीलरीसारखे घटक, उप पदार्थ जोडले आहेत, असे पवार यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link