बिजनौर : भारतीय किसान युनियनने बिलाई साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील पूर्ण ऊस बिले अदा न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी २५ डिसेंबरपर्यंत उसाचे थकीत पैसे न मिळाल्यास २७ डिसेंबरपासून बिलाई कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
रविवारी झालू विभागात भारतीय किसान युनियन अराजकीयची सभा भाकियूचे तालुका अध्यक्ष प्रमोद कुमार चौधरी यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बिलाई कारखान्याकडून गेल्यावर्षीची ऊस बिले दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. सभेत युनियनचे महासचिव सुनील प्रधान यांनी इशारा दिला की, कारखान्याने २५ डिसेंबरपर्यंत ऊस बिले दिली नाहीत तर संघटना २७ पासून आंदोलन सरू करेल. बैठकीला जितेंद्र सिंह, चौधरी जसवीर सिंह, नतेंद्र प्रधान, गुरपाल सिंह, कोमन सिंह, पुष्पेंद्र सिंह, राजीव चौधरी, राकेश प्रधान, यामीन, मलखान सिंह, अशोक कुमार, इमरान अहमद आदी उपस्थित होते.