मुजफ्फरनगर,उत्तर प्रदेश: क्षेत्रातील अलीपूर कला गावामध्ये शेतकर्यांच्या ऊस थकबाकी च्या समस्येबाबत रालोद ची बैठक झाली. बैठकीमध्ये कारखान्यांनी लवकर पैसे न दिल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
बैठकीमध्ये रालोद छात्रसभेचे प्रदेश महासचिव सार्थक लाटियान यांनी सांगितले की, गाळप हंगाम सुरु झाला आहे परंतु गेल्या वर्षी कारखानादारांनी ऊस थकबाकी भागवलेली नाही. कारखानदार आणि सरकारच्या अंतर्गत एकीमुळे शेतकर्यांचे शोषण होत आहे. मुलांच्या फीस देणे बाकी आहे, विजेचे बिल दिलेले नाही, सण तोंडावर आहेत, आणि शेतकरी आर्थिक संकटात आहे. सरकार शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने निवडणूकीत आश्वासन दिले होते की, शेतकर्यांना ऊसाचे पैसे 14 दिवसांच्या आत दिले जातील, पण हे अश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. दुसरीकडे, सरकारने शेतकरी विरोधी बिल आणून शेतकर्यांची कंबर मोडली आहे. त्यांनी कारखानादारांना इशारा दिला की, थकबाकी मिळाली नाही तर शेतकरी आरपार ची लढाई लढतील. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चौ. रामपाल सिंह होते. तर संचालन सेंवाराम शर्मा यानीं केले. यावेळी तीरेंद्र, धीर सिंह, सुरेंद्र, विपुल, अशोक, रामबीर, महेंद्र, जीतेंद्र आणि मोहित लाटियान उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.