शाहजहांपूर, उत्तर प्रदेश: डीएम इंद्र विक्रम सिंह यांनी सांगितले की, एका आठवड्याच्या आत शंभर टक्के उस थकबाकी न भागवल्यास साखर कारखान्याचे प्लांट प्रमुख यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. जीएम यांनी मकसूदापूर साखर कारखान्यावर 79.99 करोड ऊस थकबाकी न भागवल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी साखर कारखान्याचे एम पी त्यागी यांना गेल्या गाळप हंगामातील ऊस थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले आहेत.
कलेक्ट्रेट सभागृहात उस थकबाकीबाबत समीक्षा बैठकीमध्ये डीएम यांनी सांगितले की, गेल्या गाळप हंगामाचे साखर कारखाना मकसुदापूर, तिलहर, पुवाया यांचे मिळून एकूण 119.31 करोड थकबाकी देय आहे. त्यांनी सांगितले की, एका आठवड्यात शंभर टक्के थकबाकी भागवली नाही तर साखर कारखान्याच्या प्लांट प्रमुखांविरोधात कारवाई केली जाईल.
डीएम यांनी सांगितले की, गाळप हंगाम 2020-21 मध्ये कोणत्याही साखर कारखान्याकडून ऊस थकबाकी भागवण्याची सुरुवात केलेली नाही. त्यांनी सर्व साखर कारखान्याच्या प्रमुखांना आदेशांचे पालन करुन थकबाकी भागवण्याचे कडक आदेश दिले आहेत.