इन्कम टॅक्स रिटर्नचा परतावा आला नसेल तर अशी करा तपासणी

जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल आणि आतापर्यंत तुमचा रिफंड आला नसेल, तर त्याची तपासणी करण्याची गरज आहे. आयटीआर भरताना करदात्यांच्या काही चुका होतात. त्यामुळे मिळालेला परतावा उशीरा येतो किंवा अडकतो. आयटीआरचे फाइलिंग करताना याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.

आजतकवर प्रकाशित वृत्तानुसार, आयटीआर दाखल करण्याच्या अंतिम मुदतीआधीच, आयकर विभागाकडून सोशल मीडिया आणि मेसेजद्वारे अनेकदा सल्ला दिला जातो की, आयटीआरमध्ये तु्म्ही दिलेली माहिती पूर्णपणे तपासल्यानंतर सबमिट करावी. ही माहिती जुळली नसेल तर तुम्हाला मिळणारा आयकर परतावा अडकू शकतो. याशिवाय, आयकर रिटर्नचे ई-पडताळणी न झाल्यास हा अडथळा निर्माण होऊ शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर किंवा चेक किंवा डिमांड ड्राफ्ट पाठवल्यानंतर ३० दिवसांच्या आत परतावा करदात्यांच्या खात्यात थेट जमा होतो. रिटर्न भरताना, बँकेचा तपशील पूर्णपणे अचूकपणे देणे आवश्यक आहे. कारण रिफंडचे पैसे या खात्यात येतात. बँक खात्याच्या तपशिलांमध्ये अडचण आल्यास परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो. आयटीआर दाखल करताना तपशील जुळत नसल्यामुळे, परतावा मिळण्यास विलंब होतो. जेव्हा तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरता तेव्हा फॉर्म २६AS आवश्यक असतो. या फॉर्मच्या मदतीनेच तुम्हाला संपूर्ण आर्थिक वर्षात कोणत्या प्रकारच्या उत्पन्नावर किती आयकर भरला आहे याची माहिती मिळते. रिटर्न भरण्यापूर्वी हा फॉर्म तपासणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here