बेंगळुरू : ॲग्रोकेमिकल फर्म इंसेक्टिसाइड्स (इंडिया) लिमिटेड (IIL) ने ‘मिशन’ या नव्या किटकनाशकाचे लाँचिंग केले आहे. भात, ऊस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांवरील विविध लेपिडोट्रॉन किडींच्या नियंत्रणासाठी ते प्रभावी आहे. मिशन ग्रेन्यूल आणि तरल अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. मिशन हे पिकांसाठी लाभदायी किडींसाठी सुरक्षित आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
मिशनचे फॉर्म्युलेशन देशात आयआयएलकडून केले जात आहे. यापूर्वी याची आयात केली जात होती. ग्रीन श्रेणीतील हे किटकनाशक भारतात छोट्या तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांला लाभ मिळावा यासाठी आयआयएलने याची मेक इन इंडियाअंतर्गत निर्मिती केली आहे. मिशनच्या माध्यमातून किडींचे प्रभावी नियंत्रण केले जाते. मिशन भातामधील तण, पाने मोडणाऱ्या अळीचे प्रभावी नियंत्रण करते.
द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आयआयएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल म्हणाले की, आम्ही टोरी, ग्रीन लेबल, डोमिनेंट आणि स्टनरनंतर आता मेक इन इंडियाअंतर्गत मिशन हे किटकनाशक लाँच केले आहे. त्याचा वापर विविध पिकांसाठी करता येईल. शेतकऱ्यांना लेपिडोप्टेरा किंडीचे नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. भारतातील शेतकरी आता चांगल्या पद्धतीने पिकांचे संरक्षण करू शकतील असा विश्वास आम्हाला वाटतो. यातून त्यांना आपले उत्पादन वाढवण्यात आणि उत्पन्न वाढीत मदत मिळेल. पंजाब आणि हरियाणाच्या बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.