पुणे : कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दि. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाउस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरात या दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातार्यातील घाटमाथ्यावर काही भागात मुसळधार पाउस पडण्याची शक्यता आहे. तर आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोवा या ठिकाणीही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर दि. 26 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही आगामी काळात एक दोन दिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पाउस पडेल. पुणे आणि सातारा जिल्ह्यात केवळ घाटमाथ्यावरच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, दक्षिण-आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या पश्चिमेकडील पश्चिम मध्य आणि लगतच्या नैऋत्य पश्चिम बंगालच्या उपसागरावरील चक्रीय वारे महाराष्ट्राकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाउस पडण्याची शक्यता आहे.
दि. 25 सप्टेंबर रोजी कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून जोमदार ठरु शकेल, तर मराठवाडा आणि विदर्भातही सक्रिय असण्याची शक्यता आहे. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे. तर 27 सप्टेंबरपासून पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होणार असल्याचेही कश्यपी यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.